सांंगली जिल्ह्यात नवे 24 ‘कोरोना’ रुग्ण; रुग्णसंख्या 429 वर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात गुरुवारी एका डॉक्टरसह 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 429 वर गेली आहे. सध्या 160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

अथनी (जि. बेळगाव) येथील 40 वर्षीय पुरुषाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. मृतांची संख्या 12 झाली आहे. 24 कोरोना बाधितांमध्ये सांगली जिल्ह्यातील 17, कर्नाटक तसेच इतर जिल्ह्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.

सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या 61 वर्षीय डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.