परभणीत तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा ‘कोरोना’ने मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा बजावणार्या 24 वर्षीय तरुण कोरोना योद्धा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉक्टर संघरत्न खिल्लारे हे जिल्हा रुग्णालयात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर होते. त्यांची ड्युटी ही कोरोना वॉर्डात असल्याने मागची काही महिने त्यांनी इथे सेवा दिली. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अत्यंत तरुण प्रशिक्षणार्थी कोरोना योद्धा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.