मेड इन इंडिया Covid-19 ची लस घेण्यासाठी जगातील तब्बल 25 देश ‘वेटिंग’वर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. त्यावर लस निर्मितीसाठी अनेक देशांकडून प्रयत्न केले जात होते. पण भारताची कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे या लशींना जगभरातून मागणी वाढत आहे. आता याच लशींसाठी तब्बल 25 देश प्रतिक्षेत आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, भारताने आत्तापर्यंत 15 देशांना कोरोनावरील लस दिली आहे आणि इतर 25 देशांना या लशींची प्रतिक्षा आहे. यातील विशेष बाब हीच की भारताचे नाव आता जगाच्या नकाशावर पोहोचत आहे. काही गरीब देशांना अनुदानाच्या आधारे लशींचा पुरवठा केला जात आहे. तर काही देशांकडून भारत सरकारला ज्या दरात लस दिली त्याच दरात लस देण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, देशात आत्तापर्यंत 54 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. यामध्ये सर्वाधिक लस उत्तर प्रदेश राज्यातील 6.73 लाख लोकांना दिली गेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील 4.34 लाख, राजस्थानातील 4.14 लाख आणि कर्नाटकच्या 3.60 लाख लोकांना लस देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत 4 लाखांपेक्षा जास्त जणांना लस
गेल्या 24 तासांत 10,502 सत्रांमध्ये 4,57,404 लोकांना लस देण्यात आली. आत्तापर्यंत 1,06,303 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतात 11,713 नवी प्रकरणे
भारतात कोविड-19 प्रकरणे समोर येत आहेत. सध्या देशात 11,713 कोरोनाची नवे प्रकरणे पुढे आले आहेत. या सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.