दौंड बायपास रोडसाठी २५ कोटी मंजूर : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड रेल्वे उड्डाणपुल ते गोपाळवाडी (दौंड बायपास) रस्त्याचे भूसंपादन करून रस्ता सुधारणा करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.

राज्याचा सन २०१९ – २० चा पुरवणी अर्थसंकल्प विधामंडळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच सादर केला होता. यावेळी दौंड तालुक्यातील नागरिकांची दळणवळणाची सोय लक्षात घेता आमदार राहुल कुल यांनी विविध रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

दौंड शहराच्या बायपास ची मागणी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून रखडली होती. या बायपास मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात होत्या. त्यामुळे काही शेतकरी या विरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देऊन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी वारंवार करत राहिलो. त्या मागणीला आज पुरवणी अर्थसंकल्पात यश मिळाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी व भूसंपादनासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरवात देखील होईल, असे आ. कुल यांनी यावेळी सागितले. तसेच या कामाबाबत जागृत राहून काम दर्जेदार होण्यासाठी सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?