मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
फेसबुकवर झालेल्या ओळखीवरुन वैयक्तिकरित्या संपर्क साधून अडचणीत आलो असल्याचे किंवा तुमच्यासाठी भेट वस्तू पाठविल्याचे सांगून फसवणूक करण्याच्या असंख्य घटना यापूर्वी घडल्या असून अजूनही घडत आहे. आता मात्र, चोरटे व्यवसायासाठीही फेसबुकवरील मैत्रीचा वापर करु लागले आहेत. अशाच प्रकारे एका व्यावसायिकाला तिघा जणांनी २५ लाख रुपयांना गंडा घातला.
[amazon_link asins=’0753522756′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b15b6869-8719-11e8-bef0-352aece0676b’]
उमेश अमृतलाल पड्या (वय ५२, रा. शांती भुवन, वि. प. मार्ग, गिरगाव) या व्यवसायिकाची फेसबुकवर मार्च २०१८ मध्ये तिघांशी मैत्री झाली. त्यांनी ब्रायन या केमिकलच्या विक्रीमध्ये मोठा फायदा असल्याचे उमेश यांना पटवून दिले व ब्रायन नावाचे केमिकल विकत देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उमेश यांनी त्यांच्या बँक खात्यात २५ लाख ६२ हजार रुपये पाठविले. तिघांनी पुजारी हर्बल कंपनीची बनावट पावती तयार करुन उमेश यांना दिली. त्यानंतर ते आपल्याला केमिकल मिळेल याची वाट पहात राहिले. बरेच दिवस केमिकल न मिळाल्याने त्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे फेसबुक खाते बनावट असल्याचे उघडकीस आले. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.