गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांना सरकारची मदत जाहीर

२५ लाख रुपयांबरोबरच घरे देणार , मुलांच्या खर्चाची जबाबदारी सरकार घेणार

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरपाडा येथे शहीद झालेल्या जवानांना सरकारने मदत घोषित केली आहे. या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून २५ लाख रुपयांबरोबरच वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार कडून मदत करण्यात येईल तसेच शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकार घेईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरपाडा येथे बुधवारी राज्य पोलीस दलाच्या C-60 पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १५ जवान शहीद झाले तर तोमेश्वर भागवत सिंगनाथ या वाहन चालकाचाही मृत्यू झाला. सिंगनाथ याला शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य मदत देऊ, असं आश्वासनं पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे.शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने जमा केले जाणार आहेत. जवानांना कॅडरनुसार घरंही दिले जाईल तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल. असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.

भूसुरुंग IED स्फोटात क्यूआरटीचे १६ जवान शहीद –

नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना बुधवारी पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंग स्फोट करून उडवून लावल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडली. या घटनेत १६ हून अधिक क्यूआरटीचे जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या क्वीक रिस्पॉनस् टीममधील जवान खासगी वाहनाने जात असताना ही घटना घडली. नक्षलींना चकवण्यासाठी जवानांनी खासगी वाहनाचा आधार घेतला होता.