दुर्दैवी घटना : अंत्ययात्रेदरम्यान पुल कोसळला, २५ जण नदीत पडले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मृत झालेल्या व्यक्तीच्या अंतयात्रेदरम्यान नदीवरील पुल कोसळ्याने २५ जण नदीत कोसल्याची घटना महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावात घडली. ही घटना आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा पूल नादुरुस्त असून मागील २० वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची कोणतीही डागडुजी केली नसल्याची माहिती समोर येत आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावाच्या मंदिराजवळ असलेला एक वीस वर्ष जुना लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले. रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

महाबळेश्वरपासून अंदाजे ४० किमी अंतरावर खरोशी गावात कृष्णाबाई कदम या महिलेचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यविधी आज सकाळी करण्यात येणार होता. त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेत असताना गावाच्या मंदिराजवळ असलेला वीस वर्ष जुना लोखंडी पुल कोसळला यामध्ये भीमराव भागू कदम, अशोक चांगु कदम, शंकर चांगु कदम, रामचंद्र कदम, विजय शंकर कदम, राजेश शंकर कदम, रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे जखमी झाले.