सुरक्षित पुण्यात नागरिकांना कुलुप लावण्याचे विस्मरण होते तेंव्हा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असतानाच एक सुरक्षित शहर म्हणून देखील शहराची ओळख आहे. परंतु एकमेकांच्या विश्वासावर पुण्यातील जनता सुरक्षित पुण्यात घराला कुलुपच लावायला विसरते परंतु हाच डाव साधून यांच्या घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला जातो.

पुणेकरांचा हाच विश्वास त्यांना कुलुप लावण्याचे विस्मरण करण्यास भाग पाडते. पुण्यातील २५ टक्के लोक घराला कुलुपच लावायला विसरत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या विश्वासामुळेच चोरट्यांचे मनसुबे पुर्णत्वास येत असल्याचे दिसून येत आहे.
गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स या कंपनीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण केले. या निरीक्षणात पुणेकर आपल्या सुरक्षेबाबात कोणतीच काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे.

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र, पुणेकर याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर देशातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. हे सर्वेक्षण पुण्यासह देशभरातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये घेण्यात आले. पुण्यात झालेल्या सर्वेक्षणावेळी सुमारे २५० जणांशी थेट संवादही साधण्यात आला.
गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये फक्त १६ टक्के लोकांनी सीसीटीव्ही बसवले आहेत. तर २५ टक्के लोक घराला कुलुप लावण्यात विसरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ३० टक्के लोक आपल्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवतात. १० पैकी तीन जण घराबाहेर पडताना खिडक्या बंद करण्याबाबत सतर्क नसल्याचे अनेकांनी कबूल केले.