खळबळजनक ! 25 वर्षीय युवतीवर 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार

रांची : वृत्तसंस्था – झारखंड येथील सोमवारी एक खळबळजनक घटना घडली आहे. तेथील एक २५ वर्षीय युवती आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली असता त्यावेळी रस्ता अडवून ५ नराधमांनी त्या युवतीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी त्या ५ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. धनराज महतो उर्फ राज (वय, २२), हरि महतो (वय, ३०), रंजीत महतो (वय, २७), कालू महतो (वय, २४) बुलेट महतो (वय, २८) अशी त्यांची नवे आहेत.

अधिक माहितीनुसार, जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात घटना घडली. पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. इतक्यात ५ आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी घटनस्थळाहून पळवून लावले. युवतीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, या प्रकरणावरून, रात्री १० वाजण्याच्या दरम्यान युवतीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला घटनेची तक्रार दिली. सांगितलं. यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सकाळ उजाडण्या आधीच पाचही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक करुन न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.