२५ वर्षापुर्वी टाटा मोटर्समध्ये काम करणारा बनला IPS, रतन टाटांना भेटल्यावर झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष्यात जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो याचा प्रत्यय तेलंगणातील रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याबाबतीत येतो. ज्या कंपनीत त्यांनी काम केले त्या कंपनीच्या मालकांना त्यांना २५ वर्षानंतर प्रत्यक्षात भेटता आले. याविषयी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी एक फोटो शेयर केल्यानंतर ही गोष्ट समोर आली. या फोटोत कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे की, तब्बल २५ वर्षांनंतर ही महेश भागवत हे हमने टाटा का नमक खाया है… अशाप्रकारे त्यांनी पोस्ट केली. या फोटोत टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याशी हस्तांदोलन करताना ते दिसून येत आहेत.

महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील टाटा मोटर्समध्ये काही काळ काम केले. १९९३-९४ मध्ये त्यांनी टाटा मोटर्समध्ये काम केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आयपीएसची परीक्षा पास झाले. त्यानंतर २५ वर्षांनी आपण ज्या कंपनीत कधीकाळी काम केले आहे त्या मालकांशी हात मिळवायची संधी मिळेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. सध्या महेश भागवत हे तेलंगणामध्ये कार्यरत असून रचकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. अनेक वर्षांपासून ते आंध्रप्रदेशमध्ये आहेत.

दरम्यान, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय घेताना मोठ्या प्रमाणावर महिला आणि बाल तस्करीविरुद्ध काम केले आहे. त्याचबरोबर मानवी तस्करीविरुद्ध देखील ते मोठ्या प्रमाणात कारवाई करत असतात. त्याचबरोबर बालमजुरांची देखील त्यांनी आणि त्यांच्या पथकाने सुटका केली आहे.

घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या