PoK मध्ये 250-300 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात, पुलवामाची पुनरावृत्ती करण्याचा कट रचतोय PAK

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना युगात जिथे जग त्याच्याशी सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, तेथे शेजारील देश पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात गुंतलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्याआधी दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान सैन्याने सातत्याने प्रयत्न केले आहेत. जे भारतीय सुरक्षा दलाने हाणून पाडले आहेत. यासोबतच पाकिस्तान पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यासारख्या मोठा हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन दहशतवादी ठार

शनिवारी उत्तर काश्मीरच्या नौगम सेक्टरमध्ये सैन्याने दोन अतेरिक्यांचा खात्मा केला. ते नियंत्रण रेषेतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) संशयास्पद क्रियाकलाप आढळल्यानंतर सैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. दोन एके-47 रायफल्ससह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सैन्याने सांगितले की, “आज पहाटे एलओसीजवळील कुपवाडा जिल्ह्यात हंदवाड़ाच्य नौगम सेक्टरमध्ये संशयास्पद कारवाया झाल्या. सुरक्षा दलाने वेगाने हल्ला केला आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन एके-47 सह आणखी बरीच शस्त्रे जप्त केली आहेत.

मोठ्या हल्ल्याच्या कट रचतोय पाकिस्तान

जम्मू-काश्मीरच्या उत्तर-मध्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर लष्कर दहशतवाद्यांच्या हल्ल्याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बारामुल्ला येथून अल्टो कार चोरी करण्यात आली असून पाकिस्तानी दहशतवादी उस्मान हल्ल्यासाठी त्याचा वापर करणार असल्याचे समजते. गुप्तचर अहवालानुसार दहशतवादी सैन्याच्या छावणीला किंवा सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य करू शकतात. संपूर्ण भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पीओकेमध्ये 250-300 दहशतवादी

मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीवरून असे समजते की, पीओकेमध्ये एलओसी ओलांडून 250 ते 300 प्रशिक्षित दहशतवादी सध्या काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तान सैन्य कोणत्याही प्रकारे त्यांना भारतीय सीमेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like