Coronavirus : राज्यात 24 तासात 2598 नवे रुग्ण तर 85 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 59 हजारावर, गेल्या 3 दिवसांत 287 जणांचे बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनामुळे मुत्यू होण्याचे सरासरी प्रमाण 80 झाले असतानाच आज पुन्हा 85 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. तर राज्यात आज 2598 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 हजार 546 झाली आहे. राज्यात मंगळवारी 97, बुधवारी 105 आणि आज (गुरुवार) 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात राज्यात 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात 698 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात 18 हजार 616 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार122 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 2 हजार 816 कंटेनमेंट झोन क्रियाशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक 38 जणांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. वसई विरार आणि ठाण्यात प्रत्येकी 4, नवी मुंबई 2, जळगाव, रायगड, नांदेडमध्ये प्रत्येकी एक, पुणे 10, सातारा 9, सोलापूर, औरंगाबाद प्रत्येकी 3 आणि अकोल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 60 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील 45 रुग्णांचे मृत्यू, 40 ते 59 वयोगटातील 31 रुग्ण तर 40 वर्षाखालील 9 रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला. 85 पैकी 45 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like