26/11 Mumbai : हल्ल्यात शहिद झालेले अधिकारी,पोलीस कर्मचारी,नागरीक यांना शिरूर शहरातील नागरीकांच्यावतीने श्रध्दांजली

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन –   २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहिद झालेले अधिकारी,पोलीस कर्मचारी,नागरीक यांना शहरातील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून मेणबत्या लावुन शिरूर शहरातील नागरीकांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

हुतात्मा वीरजवान अभिवादन समितीच्यावतीने हुतात्मा स्मारकास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र धनक यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर २६/११ हल्ल्यातील पोलीस अधिकारी अशोक कामटे,हेमंत करकरे,विजय साळसकर,एन एस जी कमांडो संदीप उन्नीकृष्णन व पोलीस तुकाराम ओंबाळे व इतर शहिद यांना यावेळेस आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, भाजपा प्रसिद्धीप्रमुख बाबुराव पाचंगे, नगरसेवक मंगेश खांडरे,विलास खांडरे ,अनिल गायकवाड,माजी नगरसेविका मायाताई गायकवाड,काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर,प्रदीप बारवकर,अनिल बांडे,ओम प्रकाश सतिजा,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर नरवडे,योगेश महाजन,सिकंदर मन्यार, डॉ.वैशाली साखरे,वैशाली गायकवाड, अनिल गायकवाड,संदिप कडेकर,स्वप्निल माळवे,अविनाश घोगरे,शैलेश जाधव यांसह शहरातील नागरिक उपस्थित होते.

You might also like