26/11 Mumbai terror attacks : तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीपैकी एक तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी अमेरिकन सरकारने न्यायालयाला ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी वंशाच्या कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विनंतीनंतर 10 जून रोजी लॉंस एंजिलिस येथून पुन्हा एकदा अटक केली होती. त्यावेळी राणाने आपण कोरोनाबाधीत असल्याचे म्हटले होते.

तहव्वूरचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला होता. त्याने पाकिस्तानातील कॉलेज हसन अब्दालमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती. याच कॉलेजमध्ये त्याची भेट मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ सय्यद दाऊद गिलानी यांच्यासोबत झाली. राणा 1997 मध्ये कॅनडात गेला होता. 2001 मध्ये त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते.

भारत आणि अमेरिकेमध्ये 1997 मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. दरम्यान राणाला 11 जून रोजी न्यायालायत हजर केले होते. कॅलिफोर्नियात अमेरिकन ड्रस्ट्रीक कोर्टाचे न्यायाधीस जॅकलिन चूलजियान यांनी या प्रकरणी 30 जून तारीख निश्चित केली होती. राणाच्या वकिलांना 22 जूनपर्यंत याचिका दाखल करण्यास आणि संघीय सरकारला 26 जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. सहाय्यक अटर्नीने म्हटले होते की, राणाविरोधात ज्या गुन्ह्यांसाठी अटक वॉंरंट जाहीर केले होते. ते प्रत्यार्पण करारच्या अनुच्छेद 2 अंतर्गत येते.