काय सांगता ! होय, पुण्यातील सदाशिव पेठेत जुगार अड्डा, पोलिसांच्या छाप्यात 26 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सदाशिव पेठेतील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डावर धाड घातली. त्यात २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी जवळ गिरीधर पारिजात या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री तेथे छापा घातला व जुगार खेळणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१ हजार ५८० रुपये व ९०० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या सर्व २६ जणांना अटक केली असून जुगार अड्ड्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नुकतेच सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील बेकायदा धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. तरीही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने ते सुरु असल्याचे दिसून येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like