खा. सुप्रिया सुळेंच्या पुढाकारानं 26 दृष्टीहिन मुलांनी शिवरायांचा तोरणा अनुभवला

वेल्हे : पोलीसानामा ऑनलाईन –   सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील तोरणा किल्ला सर करण्याची इच्छा अनेकांची असते काहींची पुर्ण होते तर काहींची नाही. परंतु मुंबईतील 26 दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी शिवरायांचा तोरणा सर करुन अनुभवला. सकाळी 9 वाजता किल्ले चढायला सुरुवात केली. या मुलांनी अपेक्षित वेळेपेक्षा अवघ्या साडेतीन तासात नयन फाऊंडेशच्या 12 स्वयंसेवकांच्या मदतीने किल्ले तोरणा सर केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

मुंबईतील अंध मुलांनी तोरणा किल्ला अनुभवण्याची इच्छा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. यावर खासदार सुळे यांनी पुण्यातील त्यांच्या खाजगी स्वीय साहय्यक रश्मी कामतेकर यांच्याशी नयन फाऊंडेशच्या पदाधिका-यांचा संपर्क करुन दिला होता. त्यानुसार नयन फाऊंडेशच्या वतीने प्रजासत्ताक दिनी तोरणा किल्ल्यावर ट्रेकचे आयोजन केले होते.

यावेळी तोरणा किल्ला सर केलेली दृष्टीहीन सविता गव्हारे म्हणाली, ‘नयन फाऊंडेशनच्या वतीने विविध ठिकाणचे ट्रेकचे आयोजन केले जाते. परंतु छत्रपतींचा तोरणा किल्ला ट्रेक करणे खुप अवघड होता. मनात शंका होती मी वर चढु शकेल की नाही, परंतु सोबतच्या स्वयंसेवकमुळे मला किल्ला अनुभवता आला. नयन फांऊडेशनर्फे मुंबई येथे दुष्टीहिन मुलींचे गोविंदा पथक तयार केले आहे. या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व छत्रपंतींचे किल्ले अनुभवता यावे यामागचा हेतू असल्याचा फाऊंडेशनचे अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र व सचिव शार्दुल म्हातगुड यांनी सांगितले.