विमानाच्या शौचालयातून २६ लाखांचे सोने जप्त

वास्को : वृत्तसंस्था

दुबईहून दाबोळी विमानतळावर सोमवारी पहाटे उतरलेल्या एअर इंडिया विमानाची कस्टम विभागाने केलेल्या तपासणीत शौचालयात २६ लाख ५० हजार रुपयांचे तस्करी करुन आणलेले सोने सापडले. कस्टम विभागाने त्वरित कारवाई करून ते जप्त करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0496606-c147-11e8-9884-8d5a4e2462dc’]

कस्टम विभागाचे अधिकारी ह्या विमानातील शौचालयात तपासणी करत असताना त्यांना येथे लपवून ठेवलेला कमरेचा बेल्ट आढळल्यानंतर तो तपासणीसाठी चिरण्यात आला असता याच्यामध्ये सदर सोने वितळविल्यानंतर चिकटवून आणल्याचे उघड झाले.

गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया (एआय ९९४) चे विमान उतरल्यानंतर काही वेळाने ते येथून बंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार होते. या विमानात तस्करीचे सोने असल्याची खात्रीलायक माहिती येथील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सर्व विमानात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली.

टोल घेता मग खड्डे का बुजवत नाही

तपासणी करण्यात येत असताना त्यांना विमानात असलेल्या शौचालयात एक लपवून ठेवलेला कमरेला घालणारा बेल्ट आढळून आला. हा बेल्ट तपासणीसाठी घेतला असता त्याचे वजत दिड किलो ऐवढे असल्याचे कस्टम विभागाच्या समजताच यात काहीतरी भानगड असल्याचे त्यांना समजले. कारवाई करून नंतर हा बेल्ट कापण्यात आला असता याच्या मधोमध सोने वितळून चिकटवून नेण्यात येत असल्याचे उघड झाले. कस्टम विभागाने तपासणी करीत या विमानात असलेल्या प्रवाशांना हा बेल्ट कोणाचा आहे काय याबाबत विचारले असता याच्यावर कोणीही दावा केला नसल्याची माहिती कस्टम विभागाने दिली.

[amazon_link asins=’B01MTYQVB0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e57a828f-c147-11e8-aacb-213fbb179aec’]

कस्टम विभागाने नंतर पुढची कारवाई करून शौचालयातून लपवून नेण्यात येत असलेले २६ लाख ५० हजार रुपयांचे हे तस्करीचे सोने जप्त केले. सदर सोने कोण व कुठे नेत होता याबाबत सध्या चौकशी चालू असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी शेवटी दिली.

अशी होते तस्करी

गेल्या काही वर्षात सोन्यावरील करात वाढ झाल्याने तस्करीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुबईहून येणारे विमान नंतर देशांतर्गत वाहतूकीसाठी वापरले जाते. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक तपासणी होते. परंतु, देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विमानात येतानाच तपासणी होते. ते विमानातून बाहेर पडल्यानंतर त्यांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे परदेशातून येणारा प्रवासी विमानात एखाद्या ठिकाणी तस्करी करुन आणलेले सोने लपवून ठेवतो व त्यानंतर पुणे, मुंबई, गोवा येथील विमानतळावरुन देशांतर्गत प्रवासासाठी त्याचा साथीदार पुढील प्रवासात ते सोने घेऊन अशी ही तस्करी केली जाते. त्यामुळे परदेशातून आलेल्या व पुढे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांची सीमा शुल्क विभागामार्फत आतूनही बारकाईने तपासणी केली जाऊ लागली आहे. त्यातून अनेकदा अशा प्रकारे तस्करी करुन आणलेले सोने सापडले आहे.