मुंबईतून २६ मुलींची सौदी अरेबियाला तस्करी ; ६७ वर्षीय ‘म्हाताऱ्याला’ बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील २६ तरुणींची मुंबईतून सौदी अरेबियाला तस्करी करणाऱ्या ६७ वर्षीय वृध्दाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. परवाना रद्द झालेल्या एका कंपनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याने मुलींची तस्करी केल्याचे समोर आले आहे.

नजमुल हसन नाजमी उर्फ नाजमी (वय ६७) असे अटक कऱण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे परिसरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला ट्रायोटेक कन्सल्टंट नावाच्या कंपनीकडून टुरीस्ट व्हिसावर सौदी अरेबियाला पाठविण्यात आले. तिला कामासाठी पाठविण्यात आले होते. परंतु तिला ज्या स्वरुपाचे काम सांगून नेले होते. ते काम न देता गैरकृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणनीने याची माहिती तिच्या आईला दिली. तिच्या आईने याची तक्रार दिल्लीतील इमिग्रेशन संरक्षण विभागात केली. त्यानंतर नाजमी तिला ६ मे २०१६ रोजी तरुणीला भारतात घेऊन आला. त्यानंतर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाजमीने ट्रायोजेट कन्सटल्टंट कंपनीद्वारे पाठवविलेल्या प्रवाशांची माहिती मागवली. परंतु या कंपनीचा परवानाधारक मालक काही वर्षांपुर्वीच मृत झाल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला होता.

२६ मुलींना पाठवले कंपनीच्या बनावट कागदपत्रांवर

त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास केल्यावर त्याने माझगाव परिसरात कंपनीचे कार्यालय थाटले असून त्याने या कंपनीमार्फत आतापर्यंत २६ मुलींना सौदी अरेबियात पाठविल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी नाजमीचा शोध सुरु केला. मात्र तो कुर्ला परिसरात राहात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. परंतु इमरान अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या घरी गेल्यावर त्याने ते घर भाड्याने दिल्याचे समोर आले. तसेच त्याच्या भाडेकरूला त्याचा पत्ता माहिती नव्हता. शेवटी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला एलबीएस रोडवर येथील नूर मंजिल या राहत्या ठिकाणावरून अटक केली.