26 वर्षीय बंगाली अभिनेत्रीवर बलात्कार, तिच्याच घरात केला बलात्कारचा Video शूट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पश्चिम बंगालामधील कोलकाता शहरातील बिजॉयगड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील एका २६ वर्षीय अभिनेत्रीवर तिच्याच घरात ओळखीच्या इसमाने बलात्कार केल्याची घटना घडलीय. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. यात अभिनेत्रीने ८ जुलै रोजी जादवपूर पोलीस स्थानकामध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यानंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी केली आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, ५ जुलै रोजी एक ओळखीची व्यक्ती या अभिनेत्रीच्या घरी आर्थिक मदत मागण्यासाठी आली होती. यावेळी त्याने घरात ती एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला. मी घरात एकटीच राहते, असे अभिनेत्रीने तक्रारीमध्येही नमूद केले आहे. या तरुणीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओही या व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे, असे पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात कुठे वाच्यता केल्यास हा व्हिडिओ आपण व्हायरल करण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली होती, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. या धमकीला घाबरुन प्रसंग घडल्यानंतर काही दिवस ही अभिनेत्री पोलिसांकडे आली नाही. अखेर ८ जून रोजी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

मॉडलिंग, अभिनय क्षेत्रामध्ये करियरसाठी ही अभिनेत्री आपल्या मूळ गावापासून दूर कोलकत्यामध्ये एकटीच राहत होती. ज्या व्यक्तीने बलात्कार केला ती व्यक्ती या अभिनेत्रीच्या चांगल्याचा ओळखीची आहे. मात्र, काही काळापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फेसबुकवरुन या मुलाने अभिनेत्रीला संपर्क करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अगोदर तिने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र, नंतर या तरुणाने लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाल्याने मदत हवी असल्याचे या अभिनेत्रीला सांगितले. या अभिनेत्रीने त्याला पैसे घेण्यासाठी घरी बोलवले. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप अभिनेत्रीने केला. या प्रकरणात तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like