पुण्यात ‘ते’ दोघं 9 वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते, आता ‘या’ कारणामुळं 27 वर्षीय तरूणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रियकरावर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीला (27-year-old-woman-arrested-for-throwing-acid-on-lover) त्रिपुरा पोलिसांनी आगरतलापासून 50 किमीवर असणाऱ्या खोवाई तालुक्यातील बेलचेरा गावातून अटक केली. आठवडाभरापूर्वी या तरुणीने आपल्याच प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. तरुणाने लग्नाला नकार देत दोघातील नात संपवण्याची मागणी केली असता संतापलेल्या तरुणीने रागाच्या भरात त्याच्यावर अ‍ॅसिड फेकल्याचे पोलिसानी सांगितले आहे.

बिना संथल (वय 27) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्थानिक न्यायालयाने या प्रकरणी तिला 14 दिवसांची न्यायालीय कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिना आणि तिचा प्रियकर सोमन संथल हे दोघेही गेल्या 9 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्रिपुरामध्ये दोघांची कुटुंब शेजरी राहतात. 2010 पासून हे दोघे पुण्यात एकत्र राहात होते. पुण्यात राहत असतानाच बिना सोमनला अभ्यासात आणि आर्थिक हातभार लावण्यासाठी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि इतर लहानसहान काम करत असत. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सोमन एका खासगी कंपनीत कामाला लागला. त्यानंतर 2019 मध्ये तो त्रिपुराला परत आला. त्याने हळूहळू बिनाशी बोलणे कमी केले होते.

याबद्दल बिनाने अनेकवेळा सोमनशी बोलण्याचा त्याला भेटण्याचा प्रयत्न केला पण तो प्रतिसाद देत नव्हता.19 ऑक्टोबर रोजी सोमन हा बिनाला खोवाईमध्ये दिसला. तिने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या बिनाने त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. हल्ल्यामध्ये सोमनच्या चेहऱ्याला आणि तोंडाजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार दाखल केल होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्याना अगरतळामधील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सोमनच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवल्यानंतर आम्ही या प्रकरणात मंगळवारी बिनाला अटक केली असल्याचे पोलीस अधिकारी सय्यद उद्दीन यांनी सांगितले आहे.

You might also like