Coronavirus : चिंता कायम ! राज्यात 24 तासात 2739 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 120 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 82968 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या 24 तसामध्ये 2739 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 120 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82 हजार 968 इतकी झाली आहे. 37 हजार 390 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2969 रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज राज्यामध्ये 2234 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 42 हजार 600 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात 2739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 968 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 45.6 इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.57 इतका झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये 78 पुरुष तर 42 महिलांचा समावेश आहे. 53 रुग्ण हे 60 वर्षे वयाच्या वरील होते. तर 47 रुग्ण हे 40 ते 59 वर्षे या वयातले होते. तर 20 जणांचे वय 40 वर्षा खालील होते. आज मृत्यू झालेल्या 69 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळून आले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या 2969 झाली आहे.