बापरे ! परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे बेरोजगारी (Unemployment )च्या संकटामुळे मुंबई (Mumbai) महानगरी सोडून गावी गेलेल्या परप्रांतीयांची आता परतण्याची घाई सुरू झाली आहे. जुलैपासूनच परतीच्या प्रवासाला वेग आला असून आतापर्यंत परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी मुंबई (Mumbai) त दाखल झाले आहेत. त्यामध्ये उत्तर भारतीयांची संख्या 22 लाख 62 हजार 637 इतकी आहे.

लॉकडाउन शिथिल होताच परराज्यांत गेलेले नागरिक पुन्हा मुंबई (Mumbai) महानगरात परतू लागले आहेत. जुलै ते सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यात मोठ्या संख्येने प्रवासी दाखल झाले आहेत. मध्य रेल्वेवर परराज्यांतून मुंबईसाठी 15 विशेष गाड्या येतात. आतापर्यंत या गाड्यांमधून 16 लाख प्रवासी मुंबई व परिसरात दाखल झाले आहेत.

तर पश्चिम रेल्वेवर हीच संख्या 13 लाख 3 हजार 487 आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईत दाखल होणार्‍या गाड्या गोरखपूर, पाटलीपुत्र, वाराणसी, पटणा, दरभंगा, लखनौतून, तर दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम, हैद्राबाद, बैंगलोर, गडद येथून आहेत. जून ते सप्टेंबपर्यंत उत्तर भारतातून मध्य रेल्वेवरून 13 लाख 58 हजार जण आले. तर दक्षिण भारतातून के वळ 2 लाख 42 हजार जण आले आहेत. अमृतसर येथून 4 लाख 95 हजार 971 जणांनी मुंबईसाठी परतीचा प्रवास केला आहे. याशिवाय राजस्थानमधील जोधपूर आणि जयपूर येथून 3 लाख 98 हजार 850 आल्याचे सांगितले.