Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2940 नवे रुग्ण तर 99 जणांचा मृत्यू, बधितांची संख्या 65 हजाराच्या वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून गेल्या 24 तासात राज्यात 2940 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1084 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 28081 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


राज्यात गेल्या 24 तासात 2940 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 हजार 168 वर पोहचली आहे. तर राज्यात 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2197 झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


राज्यात मृत्यू झालेल्या 99 रुग्णांपैकी मुंबईत 54, वसई-विरार 7, पनवेल 7, ठाणे 6, रायगड 3 नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी 2, जळगाव 3 आणि पुणे सोलापूरमध्ये प्रत्येकी 6 आणि नागपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमधील एका व्यक्तीचा पनवेल येथे तर बिहार येथील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.