दिल्लीत ‘कोरोना’ संक्रमितांचा आकडा 80 हजाराच्या पुढं, CM केजरीवाल – HM शाह यांनी देशातील सर्वात मोठ्या कोविड -19 केंद्राला दिली भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच चालले आहे. शनिवारी राष्ट्रीय राजधानीत कोविड – 19 च्या 2948 नवीन घटना समोर आल्या. यासह, संसर्ग झालेल्यांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेली आहे. सतत वाढत्या प्रकरणांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छतरपूरमधील देशातील सर्वात मोठे कोविड – 19 केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

शनिवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये आतापर्यंत 80 हजार 188 लोक कोविड -19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या 24 तासात या आजारामुळे 66 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 2258 वर पोहोचला आहे. दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, एकूण प्रकरणांपैकी 49 हजार 301 लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. दिल्लीत सध्या 28 हजार 329 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 2210 लोकांनी कोरोनावर मात केली. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलमधील 13 हजार 411 बेडपैकी 7343 अद्याप रिक्त आहेत. त्याच वेळी डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये 4209 बेड रिक्त आहेत. या व्यतिरिक्त डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रातील 344 बेडपैकी 232 बेड पूर्ण भरले आहेत आणि 112 अद्याप रिक्त आहेत. कोरोना-संक्रमित 17 हजार 381 रुग्णांना घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 

 

शनिवारी दिल्लीत 19 हजार 180 नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत एकूण 4 लाख 78 हजार 336 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आजच्या आकडेवारीनुसार दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्या 315 आहे.

अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांनी छतरपूरमधील कोविड केअर सेंटरला दिली भेट
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सायंकाळी दिल्लीतील छतरपूर येथील राधास्वामी सत्संग बियास सेंटर येथे उभारण्यात आलेल्या सरदार पटेल कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयाचा दौरा करत व्यवस्थेची पाहणी केली. या दरम्यान अमित शहा आणि केजरीवाल यांनी येथे दाखल असलेल्या रूग्णांशीही चर्चा केली. यानंतर, त्यांनी कोविड केअर सेंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयटीबीपी डॉक्टरांशीही चर्चा केली आणि रुग्णांची परिस्थिती आणि केंद्राच्या व्यवस्थेबद्दल विचारपूस केली.