आ. राहुल कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या दौंडमध्ये

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी ११:३० वा. चौफुला ता. दौंड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरवंड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टिका करण्यात आली होती. यावेळी खुद्द शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु त्यांनीही या वक्त्यांना रोखले नाही त्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत होता. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अगोदरच पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये पैलवान आणि नटरंग या मुद्द्यावरून मोठे शीतयुद्ध रंगले आहे. त्यातच आता हा प्रकार समोर आल्याने मोठे वादळ उठले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी