2nd ODI IND vs BAN | टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : 2nd ODI IND vs BAN | रविवारी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पार पड्लेल्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत बांगलादेशने टीम इंडियावर मात करत या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे उद्या होणारा दुसरा सामना हा टीम इंडियासाठी करो व मरो असा असणार आहे. मात्र, त्या अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, रिषभ पंत यांनी दुखापतीमुळे मालिका सुरू होण्याआधीच माघार घेतली यानंतर आता अष्टपैलू शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. मीरपूर सामन्यात पहिल्या स्पेलनंतर त्याचा पाय मुरगळला, त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. (2nd ODI IND vs BAN)

 

शार्दूलच्या दुखापतीवर BCCI ची वैद्यकीय टीम उपचार करत आहे आणि त्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू आहे. जर शार्दूल ठाकूर या मालिकेतून बाहेर पडला तर दुसऱ्या वनडे सामन्यात उम्रान मलिक याला संधी मिळण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाला शार्दूलच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नसेल, तर उम्रानला संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने शमीच्या जागी वनडे मालिकेसाठी उम्रानची आधीच निवड केली आहे. अक्षर पटेल हाही पहिल्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तसेच तो ढाका येथे बुधवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. जर तो पूर्णपणे फिट आला तर शाहबाज अहमदला बाकावर बसावे लागणार आहे.

भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार) शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल(उपकर्णधार),
वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद/अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर/उम्रान मलिक,
दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

 

Web Title :- 2nd ODI IND vs BAN | india playing xi 2nd odi vs ban team management to take call on injured shardul thakur umran malik likely for 2nd odi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू

Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार