
2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीचा सलग पाचवा विजय; ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट क्लब संघाचा विजय चौकार !!
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत (2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket) क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी सलग पाचवा विजय तर, ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि आर्यन्स् क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून चौथा विजय मिळवला.
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात अमित पुजारी याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट क्लबने स्पेशलाईज्ड् क्रिकेट क्लिनिक संघाचा १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. आर्यन्स् संघाच्या अमित पुजारी याने १६ धावात ५ गडी बाद करून स्पेशलाईज्ड् क्रिकेट संघाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांचा डाव ७७ धावांवर गडगडला. हे आव्हान आर्यन्स् क्रिकेट क्लबने ७ षटकात पूर्ण केले. आयुष गोसावी याने नाबाद ५७ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
कर्णधार आर्य कुमावत याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अॅकॅडमीने आर्यन्स् क्रिकेट क्लबचा ७ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट क्लबने १७६ धावांचे आव्हान उभे केले. अर्णव पाटील याने ६२ धावा आणि विराज वासुदेवन याने ४५ धावांचे योगदान दिले. आर्य कुमावत याने ४१ धावात ३ गडी बाद करून धावांना वेसण घातले. ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अॅकॅडमीने २२.५ षटकात व ३ गडी विजय मिळवला. प्रतिक कडलक (६२ धावा), अंगद ठाकूर (३७ धावा) आणि विहान केंजळे (नाबाद ३२ धावा) यांनी धावा जमवित संघाचा विजय साकार केला. (2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket)
सार्थक शिंदे याच्या कामगिरीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी संघाने विराग क्रिकेट अॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करत सलग पाचवा विजय मिळवला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पेशलाईज्ड् क्रिकेट क्लिनिकः २५.५ षटकात १० गडी बाद ७७ धावा (विवेक पलांगे २५, आर्दश चोरघडे २०,
अमित पुजारी ५-१६) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट क्लबः ७ षटकात बिनबाद ८० धावा (आयुष गोसावी नाबाद ५७ (२७, १३ चौकार), हार्दीक खिंवसरा नाबाद १४); सामनावीरः अमित पुजारी;
आर्यन्स् क्रिकेट क्लबः २९.१ षटकात १० गडी बाद १७६ धावा (अर्णव पाटील ६२ (६८, ९ चौकार), विराज वासुदेवन ४५,
आर्य कुमावत ३-४१, युवराज मोरे २-३२) पराभूत वि. ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अॅकॅडमीः २२.५ षटकात ३ गडी बाद १७७ धावा
(प्रतिक कडलक ६२ (४२, १२ चौकार), अंगद ठाकूर ३७, विहान केंजळे नाबाद ३२, आदित्य गुरदासानी ३-३४);
सामनावीरः आर्य कुमावत;
विराग क्रिकेट अॅकॅडमीः ३० षटकात ९ गडी बाद १२९ धावा (स्वरा शिंदे ३६, आरूश पांड्ये १७, तनिश जैन ३-१३,
शौर्य देशमुख ३-१५) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीः १७.२ षटकात ५ गडी बाद १३१ धावा
(सार्थक शिंदे नाबाद ४१, देवाशिष घोडके ३१, शौर्य देशमुख २०, सुजय खैरमोडे २-७, विराट उत्तेकर २-१९);
सामनावीरः सार्थक शिंदे;
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update