Coronavirus : एकाच ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या 3 जवानांना ‘कोरोना’

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातमधील बडोद्यात लष्कराच्या तीन जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चचणीत हे जवान पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामुळे या जवानांच्या संपर्का आलेल्या 28 जणांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती लष्करी सुत्रांनी दिली आहे. लष्कराच्या जवानांना कोरोना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेले तीन जवान बडोदा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एकाच दिवशी त्यांनी एटीएममधून पैसे काढले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर लष्कराने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात जवळपास 28 जण आले होते. त्या 28 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली आहे. लष्कराच्या तीनही जवानांना एटीएममुळे कोरोनाचा संसर्ग झल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अहमदाबाद येथे तैनात असलेल्या जीआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. जवानाच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती सीआरपीएफच्या सुत्रांनी दिली.