शेटफळ हवेलीमध्ये तलवार कोयत्याने हल्ला करून तीघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील माैजे शेटफळ हवेली येथिल नाना कदम यांचे घराजवळ वाढदिवसात  बाचाबाची झाली होती. त्या कारणावरून दहा जनांच्या टोळक्याने एकावर तलवार, सुर्‍याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर त्याला वाचविण्यासाठी आलेल्या दोघांवर कोयता व लाकडी दांडक्याने मारहान करून गंभिर जखमी केल्याप्रकरणी इंदापुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद साधू भास्कर पवार (वय २० वर्षे, रा.वरकुटे खुर्द. ता. इंदापूर, जि. पूणे) याने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी साधु भास्कर पवार व त्यांचे दोन मित्र मदन काळे व दत्ता काळे हे बुधवार दिनांक २४ आॅक्टोंबर २०१८ रोजी रात्री १० वाजनेच्या सुमारास नाना कदम यांचे घराजवळ गेले होते. तेव्हा आरोपी क्रमांक १) सलिम हसन शेख( वय वर्षे २१ रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर), २) अन्सर शेख (रा.शेटफळ ह),  ३) अक्षय सिताराम जगताप (वय २८ रा. शेटफळ.ह.), ४) हसन रहिमान शेख (वय ४०वर्षे, रा.शेटफळ ह.), ५) नाना कदम (रा. शेटफळ ह.), ६) मयुर कदम (रा.शेटफळ ह.), ७) अनिकेत जगताप (रा. शेटफळ ह.),  ८) सिताराम जगताप (रा.शेटफळ. ह.), ९) कबिर शेख (रा. काटी.), १०) पिन्नु शेख (रा. काटी) हे सर्वजन मिळुन हातामध्ये तलवारी, कोयता, कुर्‍हाडीचे लाकडी दांडके घेवुन आले. व त्यांनी अनिकेत जगताप व अन्सार शेख यांचे वाढदिवसात झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून फिर्यादी साधु पवार यास वरील नमुद केलेल्या पैकी आरोपी क्र.९ कबीर शेख (रा. काटी) याने त्याचे हातातील तलवारीने फिर्यादीचे डाव्या हाताचे दंडावर वार केला. व आरोपी क्र. २  अन्सर शेख  (रा. शेटफळ हवेली) याने त्याचे हातातील सुरीने फिर्यादी साधु पवार याचे छातीवर वार केला.

यावेळी फिर्यादीचा मित्र मदन अरून काळे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता, त्याला आरोपी क्र. १० (पिन्नु शेख रा. काटी) याने हातातील कोयत्याने डोक्यात वार केला.  व दादा काळे यास आरोपी क्र. ७ अनिकेत जगताप (रा. शेटफळ हवेली) याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने उजव्या हातावर मारहान केली. तसेच आरोपी क्र. १,३,४,५,६,८ यांनी हाताने व लाथाबुक्यांनी फिर्यादी व फिर्यादीचे मित्र मदन काळे व दादा काळे यास मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दि. २५ आॅक्टोंबर रोजी साधु भास्कर पवार (रा. वरकुटे खुर्द.) याने इंदापूर पोलिस स्टेशनला दाखल केली आसुन इंदापूर पोलिसांनी कलम ३०७,३२३ प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला आहे. घटनेचे गांभिर्य ओळखुन या घटनेचा तपास करणारे पोलिस उपनिरिक्षक एस. एन. औटी यांनी तीन आरोपिंना अटक केली असल्याची माहीती दीली.