जुन्नरमधील कावळे पिंपरीत तीन मुलांचा बुडून मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन

जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b59eea1-bfbe-11e8-a7dd-850d80752839′]

या दुर्घटनेत गणेश नारायण चक्कर ( वय ९),सुमित सावकार पाबळे ( वय ११ ), वैभव विलास पाबळे ( वय  ११) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात सर्व गणपतीचे विसर्जन होते. मिरवणुकीनंतर सार्वजनिक गणपती मंडळे व घरगुती गणपती मंडळांचे विसर्जन सुरु होते. यावेळी काही मुले तळ्यात उतरली होती. विसर्जनाबरोबर तळ्यात टाकलेले नारळ ही मुले काढत होती. त्यात पाच मुले तळ्याच्या पाण्यात पुढे गेली. त्याचवेळी काठ्यावर गणपती मंडळांची आरती सुरु होती. पुढे गेलेल्या ही मुले अचानक पाण्यात बुडाली. हे समजताच लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. पण, तोपर्यंत या मुलांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. ते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. व जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दोघा मुलांना वाचविण्यात यश आले.  मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यु झाला. आळे येथील रुग्णालयात त्यांचे मृतदेह आणण्यात आले आहेत.

कोल्हापूरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांच्या लाठीमारात ३ जखमी

या घटनेची माहिती मिळाल्यावर अनेक राजकीय पक्षाच्या  नेत्यांना रुग्णालयात जाऊन या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे कावळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

[amazon_link asins=’B078124279,B07DRJ4HD6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c08875b0-bfbe-11e8-a831-89f0fa59add1′]