पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र सुरुच ; वेगवेगळ्या घटनेत तिघांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहरात तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या घटना घडल्या असून यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या घटनेत परदेशातून भेट वस्तू पाठविण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली.

भवानी पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्य़ादेवरून त्यांची एका महिलेशी डिओशी मेट्रोमनी साईटवर ओळख झाली. काही दिवासांनी त्यांची ओळख वाढल्यानंतर महिलेने तक्रारदाराला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच परदेशातून महागड्या वस्तू पाठवण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदाराला भेटवस्तूचे कुरिअर खर्च तसेच विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटवस्तू जप्त केली असल्याचे सांगितले.

भेटवस्तू सोडवून घेण्यासाठी महिलेने तक्रारदाराला १ लाख ८२ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने पैसे भरले मात्र, पैसे भरून देखील भेटवस्तू न मिळाल्याने त्यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) यु.जी. चक्रे करीत आहेत.

कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

हडपसर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला तात्काळ चार लाखांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून ३६ हजार ५०० रुपायांची फसवणूक केली. तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. काही दिवासांपूर्वी तरुणाला दिल्ली येथून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मनी क्यु फायनान्स मंगोलपुर येथून बोलत असल्याचे सांगितले.

तुम्हाला तात्काळ चार लाखांचे कर्ज मंजुर करण्यात येईल असे सांगितले. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी काही रक्कम बँक खात्यात भरण्यास सांगितले. तात्काळ कर्ज मिळणार असल्याने तरुणाने बँक खात्यामध्ये पैसे भरले. पैसे भरून देखील कर्ज न मिळाल्याने तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

व्यावसायिकाची १४ लाखांची फसवणूक

कोरेगाव पार्क भागातील एका व्यावसायिकाला समाजमाध्यमावरून झालेल्या ओळखीतून १४ लाख २७ हजारांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराची एका महिलेबरोबर समाजमाध्यमातून ओळख झाली होती. तिने परदेशात असल्याची बतावणी केली होती. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने तक्रारदाराला एका बँक खात्यात १४ लाख २७ हजार रूपये भरण्याची सूचना केली होती. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने तक्रार दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

Loading...
You might also like