गुजरात : राजकोटच्या कोविड-19 हॉस्पिटलमध्ये भीषण आग, 5 कोरोना रूग्णांचा जळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये शुक्रवारी एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा मृत्यू झाला. कोविड-19 हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये ही आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍याने सांगितले की, आग लागल्यानंतर हॉस्पिटलमूधन अन्य 30 कोरोना रूग्णांना बाहेर काढण्यात आले, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फायर ब्रिगेडचे अधिकारी जे बी थेवा यांनी म्हटले की, मावडी परिसरातील उदय शिवानंद हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मध्यरात्री सुमारे 1 वाजता आग लागली, जिथे 33 रूग्णांना दाखल करण्यात आले होते. यापैकी 7 रूग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो आणि 30 रूग्णांना वाचवून बाहेर काढले. तर आयसीयूच्या आत तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समलेले नाही.

रेस्क्यू करण्यात आलेल्या रूग्णांना दुसर्‍या कोविड-19 हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये सुद्धा अहमदाबादमध्ये चार मजली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने आठ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता.

You might also like