मनोज मौर्या हत्या प्रकरण : तीन आरोपींना पोलिसांनी केले अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

दादर फुल मार्केट येथे गोळ्या झाडून मनोज मौर्या या ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना केवळ ४८ तासात मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, ३ आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील गँगवार पूर्णपणे खणून काढणाऱ्या मुंबई पोलिसांसमोर या प्रकारामुळे आव्हान निर्माण झाले होते. अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईत डोके वर काढत असल्याची शंकाही या प्रकारामुळे व्यक्त केली जात होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6824a0c-d103-11e8-87e9-e79964e5c5a1′]

मनोज मौर्या हत्याप्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणातील तिन्ही आरोपींचे मयत मनोज मौर्या याच्या सोबत जुने भांडण होते. या भांडणाचा राग या तिनही  आरोपींना होता. २०१५ ते २०१७ पर्यंत मयत मनोज मौर्या आणि त्याची पत्नी हे दिल्लीत सदर आरोपींच्या कारखान्यात काम करत होते. मनोज मौर्या याची हत्या करण्यासाठी मुख्य आरोपी राधाकृष्ण मुनारिका कुशवाह (३७) याने ५० हजारांची सुपारी इतर दोन आरोपींना दिली होती. घटनेच्या दोन दिवस आधी आरोपींनी मनोज मौर्या याच्या संदर्भात माहिती गोळा केली होती. पोलिसांनी मनोज मौर्या हत्या प्रकरणात राजेंद्र अमर सिंग अहेरवार (३५) आणि हेमेंद्र ब्रिसभान कुशवाह (वय १९) यांच्यासह मुख्य आरोपी राधाकृष्ण कुशवाह या तिघांना दिल्लीतून अटक केली आहे. तिनही आरोपींना न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेहबूबा मुफ्तीना दहशतवादी मन्नान वाणीसाठी मायेचा पाझ