CRPF जवानाने केला सहकाऱ्यांवर गोळीबार, ३ जवानांचा मृत्यू

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार होत असतो. मात्र आपल्याच जवानांकडून सहकाऱ्यांवर गोळीबार झाला तर… कल्पना करवत नाही. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना उधमपूर मधील बट्टल बलियान येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे.

आरोपी जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलमधून हा गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. त्यामुळे या जवानाचीही प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला करुन आरोपी जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. या जवानांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. या वादाचं पर्यवसन गोळीबारात झालं, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

राजस्थानातील झुंझूनू इथले हेड कॉन्स्टेबल पोकरमाल आर, दिल्लीतील योगेंद्र शर्मा आणि हरियाणाच्या रेवाडी इथल्या उमेद सिंह यांचा मृत्यू झाला. हा गोळीबार करणारा जवान मूळचा कानपूरचा असून अजितकुमार असं याचे नाव आहे. सैन्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हे सर्व जवान सीआरपीएफ १८७ बटालियनचे आहेत. त्यामुळे उधमपूरचे एसएसपी राजीव पांडे, त्यांच्यासह सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us