आगामी 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक राज्यात ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तमिळनाडू, पाँडेचेरी, करायकल, केरळ तसेच माहे मध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण – पश्चिम मान्सूनने रविवारी उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या काही भागात सरकण्याबरोबरच पूर्व तसेच मध्य भारताच्या अनेक भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. याबरोबरच उत्तर पूर्व भारताचा काही भाग, पश्चिम भारताचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या भागात तसेच मध्य अरबी समुद्राच्या काही भागात 2 दिवसांच्या दरम्यान मान्सून अनुकूल असल्याने पावसाची शक्यता आहे.

मान्सून विभागाने सांगितले की जवळपास 17 ऑक्टोबरला पूर्वोत्तर मान्सून अनुकूल होण्याच्या स्थितीत आहे. या दरम्यान ओडिसा, छत्तीसगड, कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र, तमिळनाडू, पाँडेचेरी, कारायकल, कर्नाटक, केरळ माहे तसेच लक्षद्वीपच्या विविध भागात वादळी वाऱ्याचा परिणाम दिसून येईल.

ओडिसा, जम्मू काश्मीर, कोकण, गोवा, आंध्रप्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, तमिळनाडू, पाँडेचेरी, करायकल, कर्नाटक, केरळ तसेच माहे मध्ये मागील 24 तासात वादळी वारे वाहत आहेत. या दरम्यान कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग, केरळ तसेच लक्षद्वीपमध्ये काही भागात पाऊस झाला तर काही भागात ढगांचा गडगडात झाला.

मागील 24 तासात पश्चिम बंगाल, सिक्कीम, कोकण, गोवा, आंध्रप्रदेश किनारपट्टी, कर्नाटक तसेच अंदमान निकोबार बेट समूहात देखील मुसळधार पाऊस झाला. याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, ओडिसा, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा तसेच रायलसीमेच्या विभिन्न भागात पाऊस झाला. दक्षिण पश्चिम मान्सून मागील 24 तासा दरम्यान किनापट्टी भागात आणि केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला होता.

अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, मध्यप्रदेश, गुजरात, विदर्भ, रायलसीमा मध्ये पाऊस कमजोर झाला होता. तर नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, सौराष्ट्र तसेच कच्छ या दरम्यान मान्सून कमजोर झाला. झारखंड, पश्चिम मध्य प्रदेशच्या विविध भागात तापमान सामान्य पेक्षा कमी राहिले, सर्वाधिक तापमान चुरु (पश्चिम राजस्थान) मध्ये 38.2 डिग्री राहिले.

पश्चिमी राजस्थानच्या काही भागात पंजाब, हिमाचल प्रदेश तसेच पश्चिमी उत्तर प्रदेशच्या विविध भागात रात्रीच्या वेळी तापमान सामान्यपेक्षा कमी होते. तर उत्तराखंडमध्ये तसेच जम्मू काश्मीरच्या काही भागात रात्रीच्या वेळी तापमान सामान्यपेक्षा अधिक होते. पश्चिम मध्यप्रदेशच्या काही भागात बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व मध्यप्रदेश, सौराष्ट्र तसेच कच्छच्या विभिन्न भागात सामान्यापेक्षा कमी होते. देशाच्या बाकी भागात तापमान सामान्य राहिले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like