पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ३ उपायुक्‍तांच्या बदल्या, ३ नव्या उपायुक्‍तांची नियुक्‍ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (सोमवारी) राज्य पोलिस दलातील तब्बल ३७ आयपीएस अधिकारी आणि इतर ५२ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्‍तालयातील एकाचा तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील दोन महिला पोलिस उपायुक्‍तांचा समावेश आहे. उपायुक्‍त स्मिता पाटील, उपायुक्‍त सुधिर हिरेमठ यांची पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात तर उपायुक्‍त पोर्णिमा गायकवाड यांची पुणे आयुक्‍तालयात नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील स्मार्तना पाटील यांची ठाणे आयुक्‍तालयातील विशेष शाखेत तर नम्रता पाटील यांची राज्य गुप्‍तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. पुण्यातील झोन-३ चे पोलिस उपायुक्‍त मंगेश शिंदे यांची पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यात झोन-३ च्या उपायुक्‍तपदी पोर्णिमा गायकवाड यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आयपीएस अधिकारी सुधिर हिरेमठ आणि स्मिता पाटील यांची उपायुक्‍त म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सुधिर हिरेमठ यांनी यापुर्वी पुणे पोलिस आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत उपायुक्‍त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. तसेच त्यांनी त्यावेळी झोन-४ आणि झोन-१ चे उपायुक्‍त म्हणून देखील काम पाहिले होते. उपायुक्‍त स्मिता पाटील यांनी देखील पुणे पोलिस आयुक्‍तालयात कर्तव्य बजाविले आहे. त्यावेळी त्या चतुःश्रृंगी विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त होत्या. नंतर त्यांची पदोन्‍नती झाली आणि त्या उपायुक्‍त बनल्या.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

Loading...
You might also like