30 दिवसात 3 ग्रहण ! चंद्रग्रहणामुळं उडणार ‘गोंधळ’ तर सुर्यग्रहणामध्ये आपल्या वक्र चालीनं 6 ग्रह करतील जगाला ‘परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण एक दुर्मिळ खगोलीय घटना असून त्याचा प्रभाव कोणत्याही व्यक्तीस लाभदायक नसतो. हे सांगण्याचे कारण ३० दिवसांत तीन ग्रहण लागणार आहेत. ५ जून आणि ५ जुलै रोजी चंद्रग्रहण लागणार असून २१ जून रोजी सूर्यग्रहण आहे. ज्योतिषांच्या मते शेकडो वर्षानंतर हा योगायोग आला आहे. यावर्षीचे हे दुसरे चंद्रग्रहण असून पहिले चंद्रग्रहण १० जानेवारी रोजी लागले होते. आता दुसरे चंद्रग्रहण ५ जून रोजी रात्री ११:१५ वाजता लागेल आणि ६ जून दुपारी २:३४ वाजेपर्यंत सुरू राहील. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रात लागणार आहे. यानंतर २१ जून रोजी लागणारे सूर्यग्रहण सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ३ मिनिटांपर्यंत राहील. भारतासह हे सूर्यग्रहण अमेरिका, दक्षिणपूर्व युरोप आणि आफ्रिकेतही दिसून येईल. जूनमध्ये दोन ग्रहण लागल्यानंतर तिसरे ग्रहण ५ जुलैला लागणार आहे, जे या वर्षातील तिसरे चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण सकाळी ८.३८ वाजता सुरू होईल आणि सकाळी ११:२१ वाजेपर्यंत राहील. दिवस असल्याने हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी धनु राशीत लागेल. यावर्षीचे चौथे आणि शेवटचे ग्रहण ३० नोव्हेंबर रोजी लागणार आहे, जे दुपारी १.३४ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ५.२२ वाजेपर्यंत राहील. दिवस असल्याने हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत असेल.

असा परिणाम होईल:
ज्योतिषांच्या मते, ग्रहणावेळी तयार झालेल्या ग्रहांच्या स्थानामुळे येणाऱ्या ३ ते ६ महिन्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानविषयक भविष्यवाणी करण्याची शतकानुशतक भारतात जुनी परंपरा आहे. यात सांगितले गेले आहे की, जेव्हा एका महिन्यात दोनपेक्षा जास्त ग्रहण लागतात आणि पाप ग्रहांचा देखील त्यांच्यावर प्रभाव असतो, तेव्हा तो काळ जनतेसाठी त्रासदायक असेल. तीन ग्रहणांमधील पहिले दोन ग्रहण, जे आषाढ कृष्ण पक्षात लागणार आहेत ते भारतात दिसतील. आषाढ शुक्ल पक्षामधील शेवटचे ग्रहण भारतात दिसणार नाही. मिथुन आणि धनु राशीच्या अक्षाला त्रास देणारे हे ग्रहण अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांसाठी विशेषतः अशुभ ठरेल. २१ जूनचे सूर्यग्रहण जगासाठी अत्यंत संवेदनशील आहे. मिथुन राशीत लागणाऱ्या या ग्रहणाच्या वेळी मंगळ जलीय राशी मीन मध्ये स्थित होऊन सूर्य, बुध, चंद्र आणि राहूला दिसेल, ज्यामुळे अशुभ परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय ग्रहणावेळी ६ ग्रह शनि, गुरु, शुक्र व बुध वक्र होतील. तर राहू केतु नेहमीच वक्र चालतात, त्यामुळे यांना मिळून एकूण ६ ग्रह वक्र राहतील, जे शुभ नाही. या परिस्थितीत, संपूर्ण जगात मोठी उलथापालथ होईल.

नैसर्गिक आपत्ती येईल:
यावेळी या मोठ्या ग्रहांच्या वक्र होण्याने नैसर्गिक आपत्ती जसे की, अधिक पाऊस, सागरी चक्रीवादळ, वादळ, महामारी इत्यादीमुळे खूप हानी होऊ शकते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेला जून आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस आणि पुराचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत या देशांमध्ये बर्‍याच ठिकाणी महामारी आणि अन्नाचे संकट उद्भवू शकते. मंगळातील पाण्याच्या घटकाची राशी मीनमध्ये पाच महिने राहील, म्हणून पावसाळा असताना असामान्य पाऊस आणि महामारीची भीती राहील. ग्रहणावेळी मकर राशीत शनि व गुरु हे वक्र होणे, याबाबत इशारा देतात कि चीनशी पाश्चात्य देशांचे संबंध आणखी खराब होऊ शकतात.