कमी वयात केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात ? ‘हे’ 3 योग सर्वोत्तम उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लहान वयातच केस गळण्याच्या आणि तुटण्याच्या समस्येमुळे प्रत्येक दूसरी व्यक्ती त्रस्त आहे. पाण्यासारखा पैसा घालूनही (केस गळती) या समस्येपासून मुक्त होणे सोपे नाही. दरम्यान, फेस योगा एक्सपर्ट मानसी गुलाटी यांनी यावर उपाय सांगितला आहे. या योगासनेच्या सहाय्याने केसांशी संबंधित ही समस्या संपवता येऊ शकते.

वास्तविक, मानसी गुलाटी यांनी अशा तीन योगांविषयी माहिती दिली आहे, जे नियमितपणे केल्यास डोक्याच्या रक्ताभिसरणात सुधारणा होते. त्यासाठी त्यांनी स्क्वीज पोज़, बालासन आणि पवनमुखासन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. योग तज्ञांचा असा दावा आहे की, केसांच्या वाााढीसाठी दर अर्ध्या तासाने पाणी पिणे एक चांगला उपाय आहे, तसेच हे योग केल्यास केसांशी संबंधित सर्व समस्या संपू शकतात. ते आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप चांगले आहे.

जाणून घ्या योग करण्याचे योग्य मार्ग :
1 – स्क्वीज पोज़
हे आसन करताना दिर्घ श्वास घेत आपल्या चेहऱ्यावर ताण एकत्र करा. थोड्या वेळ त्याच स्थितीत राहून नंतर श्वास सोडत ताण रिलीज करता. हे आपल्या नर्व्ह सिस्टीमला स्टीम्यूलेट करते.

2- बालासन
हे आसन करताना सर्वप्रथम वजासनमध्ये बसा. नंतर दिर्घ श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर गुडघ्यात अंतर ठेवून आपले कपाळ जमीनीवर टेकवा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन ठीक होते.

3- पवनमुखासन
यासाठी जमिनीवर झोपा, नंतर आपले गुडघे कपळाला टेकवा. थोड्यावेळ त्याच स्थितीत राहून नंतर साधारण स्थितीत या.