3 फुटाचा नवरदेव आणि 4 फुटाची नवरी, लॉकडाऊन मध्ये झालेल्या ‘या’ लग्नाची सर्वत्र चर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन दरम्यान जिथे आधी ठरवलेले विवाह रद्द केले जात आहेत, तर काही विवाहांची वेगळीच चर्चा होत आहे. महाराष्ट्रात एक वेगळाच विवाह पाहायला मिळाला. हे लग्न २९ वर्षाचा मुलगा आणि १९ वर्षाच्या मुलीचे झाले आहे, पण त्यांची उंची होती ४ फूट आणि ३ फूट.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तहसीलमध्ये बुधवारी एक वेगळाच विवाह झाला. हे लग्न २९ वर्षीय झामरू राजेंद्र कोळी आणि १९ वर्षीय नयना यांच्यात झाले.

या लग्नाची खास गोष्ट अशी होती, की नवरदेवाची उंची ३ फूट होती, तर नवरीचीदेखील फक्त ४ फूट होती.

नवरदेव झामरु दहावीपर्यंत शिकला आहे, तर नवरी नयना बारावीपर्यंत शिकली आहे. दोघांचे लग्न अगोदरच ठरले होते, पण कोरोना संकटामुळे गोष्टी पुढे जात नव्हत्या.

अखेर गावातच एका साध्या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून बुधवारी हे लग्न झाले. नातेवाईक देखील या लग्नाला येण्याचा प्रयत्न करत होते, पण लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत.