बुधवार पेठेत चक्‍क 4 परदेशी अल्पवयीन मुली आढळल्या, पोलिसांकडून सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काम देतो, असे सांगून नेपाळ, बांगला देशातून पुण्यात आणून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलेल्या ४ अल्पवयीन मुलींची फरासखाना पोलिसांनी सुटका केली आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ५ जणींना अटक केली आहे.

बांगला देशातील एका १६ वर्षाच्या मुलीला तुला चांगले काम मिळवून देतो, असे सांन मेलॉन याने तिला पुण्यात आणले. बुधवार पेठेतील नवीन सागर बिल्डिंगमधील कुंठणखान्यात विकले. कुंठणखाना मालकिणींनी ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याकडून ते जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत होते. पोलिसांनी येथे छापा घालून तिची सुटका केली व दोघींना अटक केली.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस यांनी फिर्याद दिली आहे.  याचप्रमाणे नवीन बिल्डिंगमधील दुसऱ्या  मजल्यावर छापा घालून तेथून १६, १७ व १८ वर्षे वयाच्या नेपात्, बांगला देशातील तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली़ याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघींना अटक करण्यात आली आहे.