3 युवतींना एकाच वेळी सोबत घेऊन पळाला तथाकथित ‘बाबा’, कुटुंबियांची पोलिसांकडे धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरमीत, राम रहीम आणि आसाराम बाबा यांच्यानंतर कोणत्याना कोणत्या बाबांचीअश्लील कृत्ये समोर येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता छत्तीसगढमधील स्वामी रितेश्वर महाराज यांच्यावर तीन मुलींना पळवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगढ़ जिल्ह्यातील तीन तरुणी 10 सप्टेंबरपासून गायब आहेत. या तरुणींच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, या बाबाने या मुलींचे ब्रेनवॉश करत त्यांना आश्रमात आणले होते. तसेच या बाबाच्या विचारांनी प्रभावित होत या युवतींनी घरच्यांना कोणतीही माहिती न देता या आश्रमात राहायला आल्या होत्या. या युवतींनी आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारचे सामान नेले नसून आता त्या घरी येण्यास मनाई करत आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी रितेश्वर महाराज त्यांच्या गावात प्रवचन देण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या ओळखीनंतर मुली गावातील कृष्ण लीला मध्ये गोपिकांच्या भूमिका साकारत होत्या. त्यानंतर या युवती 10 सप्टेंबरपासून आश्रमात राहायला गेल्या आहेत. मुलींनी घर सोडण्याआधी एक पत्र लिहिले असून, त्यांनी यामध्ये गुरूला आईवडिलांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हटले असून त्यांना न सापडण्याची देखील विनंती केली आहे.

दरम्यान, रायगढ़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुली सज्ञान असून त्यांनी त्यांच्या मर्जीने घर सोडले आहे. मात्र नातेवाईकांनी याविषयी तक्रार दाखल केली आहे. या मुलींचे लोकेशन हे मथुरामध्ये आढळून आले आहे. तेथील पोलिसांनी मथुरा पोलिसांशी संपर्क केला असून जर त्या मुली घरी येण्यासाठी तयार असतील तर त्यांना घरी आणले जाईल.

Visit – policenama.com 

You might also like