‘या’ फळाचे 3 फायदे जाणून घेतले तर व्हाल आश्चर्यचकित !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्या फळाबाबत आपण माहिती घेणार आहोत त्या फळाचे नाव आहे स्टार फ्रुट. हे फळ गाव असो की शहर सर्वत्र मिळते. पिवळ्या रंगाचे हे फळ चविष्ठ असते, त्याची चव आंबटगोड असते. उन्हाळा तसेच हिवाळ्यातही हे फळ मिळते. या फळाचे रोज सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. या फळाचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1) वजन कमी करण्यासाठी हे उपयोगी आहे. यात फायबर आणि अन्य पोषकतत्व भरपूर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. सूज कमी होते. पोट लवकर भरते. यामुळे भूक लवकर लागत नाही.

2) हे फळ खाल्ले तर शरीराला उर्जा मिळते.

3) हे फळ सेवन केल्याने उत्साह वाढतो.

चांगल्या स्वादासाठी या कापलेल्या फळावर काळीमिरी पावडर आणि जीरे पावडर भुरकवून खावू शकता.