पुण्यात झालेल्या ट्रक अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच केंद्रातील सरकारने मोटार वाहन (दुरुस्ती ) विधेयक २०१९ मंजूर करून त्याची अंमलबजावणी सूर केली आहे. तरीही रस्ते अपघातांची मालिका काही कमी होताना दिसत नाही. आज मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे पिरंगुट घाट उतारावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 जणांचा जागीच मृत्यू
हा भीषण अपघात आज रात्री ९ च्या सुमारास घडला आहे. पिरंगुट घाट उतरावर भरधाव वेगाने येत असेल्या ट्रकने काही दुचाकींना जोरदार धडक देऊन ५ जणांना उडवले आहे. त्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर २ जण गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातानंतर घाबरून पळून जाणाऱ्या ट्रक चालकास घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलीस मयूर निंबाळकर व इतर नागरिकांनी पकडले.

ट्रकचालकाने मद्यपान केल्याचे आढळून आले
गाडीचा ट्रकचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. आता अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघातातील जखमींवर पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करणे सुरु केले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

You might also like