सातारा रोडवरील अपघातात पुण्यातील ३ तरुणांचा मृत्यु ; ट्रकच्या धडकेने ५ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यु झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. हे सर्व तरुण तळजाई येथील राहणारे आहेत.

सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार), सुरज शिंदे (वय २४) आणि अनिकेत भारत रणदिवे (वय २३) अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

करण जाधव, राकेश कऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना ससेवाडी येथील श्र्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी, तळजाई पठार परिसरात राहणाऱ्या या मित्रांनी काल रात्री पार्टी केली. त्यानंतर त्यांचे शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला जाण्याचे ठरले. त्यानुसार मध्यरात्री साडेबारा वाजता ते ३ मोटारसायकलवरुन ८ जण निघाले. कात्रजमार्गे ते शिंदेवाडी येथे आले असताना पाठीमागून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकची त्यांना धडक बसली. त्यात ८ जण जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या श्र्लोक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यात तिघांचा मृत्यु झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच तळजाई परिसरातील तरुण घटनास्थळी रवाना झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –