पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात 3 ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकचा भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

गणेश सुखदेव दराडे (वय-२९, रा. कर्हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८, रा. दरेवाडी, ता. संगमनेर), अजय श्रीधर पेदाम (वय-२७, रा. पांजरे, ता. चंद्रपूर) ही मयतांची नावे आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जात असताना कर्हे घाटात कार (एमएच.१९, बीजी ८१११) पुढे चाललेल्या ट्रकला (एमएच.१२, केपी १७९९) पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिनही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

visit : policenama.com 

You might also like