Coronavirus : जगात ‘कोरोना’मुळे 3 लाख जणांचा मृत्यु, बाधितांची आकडा 45 लाखांवर, 10 देशात 72 % रुग्ण

वॉशिंग्टन : कोरोना महामारीचा जगभरातील थैमान अजून सुरुच आहे. आतापर्यंत जगभरातील तब्बल ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे. गेल्या २४ तासात ५ हजार ३०५ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जगभरात ३ लाख ३ हजार ३७२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जगभरात भारत आज १४ वरुन १२ व्या क्रमांकावर आला आहे.
जगभरात आतापर्यंत ४५ लाख २५ हजार ४२० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल ७२ टक्के केसेस या जगातील १० प्रमुख देशांमध्ये आहेत. या १० देशात ३२ लाख ५३ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात जगभरात तब्बल ९५ हजार ५१९ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.

कोरोना विषाणुपासून आतापर्यंत १७ लाख ३ हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहेत.  जगभरात अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असून जगभरातील मृतांपैकी एक तृतीयांशाहून अधिक जणांचा अमेरिकेत मृत्यु झाला आहे.  कोरोना बाधितांच्या संख्येत काही दिवसांपूर्वी भारताचा क्रमांक १४ वा होता. परंतु, गेल्या काही दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्येने तो आता १२ व्या क्रमांकावर आला आहे.

देश व त्यातील कोरोना बाधित आणि मृत्युंची संख्या

अमेरिका – १४५६७४५ (८६९०० मृत्यु)
स्पेन – २७२६४६ (२७३२१)
रशिया – ३५२२४५ (२३०५)
इंग्लड – २३३१५१ (३३६१४)
इटली- २२३०९६ (३१३६८)
ब्राजील – २०२९१८(१३९९३)
फ्रांस – १७८८७० (२७४२५)
जर्मनी – १७४९७५ (७९२८)
तूर्की – १४४७४९(४००७)
ईरान – ११४५३३ (६८५४)
चीन – ८२९२९ (४६३३)
भारत – ८१९९७ (२६४९)