‘नोटाबंदी’नंतर मोदी सरकारने ३.८१ लाख ‘नोकऱ्या’ दिल्या, जाणून घ्या ‘आकडेवारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोजगाराच्या मुद्यावर विरोधकांकडून घेरण्यात आलेल्या मोदी सरकराने गेल्या २ वर्षात ३.८१ लाखापेक्षा आधिक नोकऱ्या दिल्यात. या 2 वर्षात सर्वात आधिक म्हणजेच ९८ हजार ९९९ लोकांना रेल्वे मंत्रालयाने नोकऱ्या दिल्यात. रोजगारा संबंधित हे आकडे त्यावेळी समोर आलेत ज्यावेळी विरोधकांना हा मुद्दा उचलून धरायचा होता.

विरोधकांकडून कायमच २०१६ साली नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर बेरोजगारी वाढली असा आरोप मोदी सरकारवर करण्यात येतो. नोटबंदी ८ नोव्हेबर २०१६ च्या रात्री करण्यात आली होती.

काय आहे रोजगारांची आकडेवारी –
अर्थ संकल्प २०१९ – २० नुसार १ मार्च २०१७ पर्यंत विविध सरकारी संस्थामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ३२ लाख ३८ हजार ३९७ होती. जी एक मार्चला वाढून ३६ लाख १९ हजार ५९६ झाली. यानुसार मागील २ वर्षांत रोजगाची संधी वाढून ३ लाख ८१ हजार १९९ रोजगार निर्माण झाला आहे.

अर्थ संकल्पात सांगण्यात आले की, सर्वात आधिक रोजगार रेल्वेने निर्माण केला असून तो ९८ हजार ९९९ आहे. मार्च २०१७ साली रेल्वे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या १२.७ लाख रुपये होती. १ मार्चला ती १३.६९ लाख झाली.

पोलीस दलात मिळाल्या ८०,००० नोकऱ्या –
आवाहलानुसार या दरम्यान पोलीस दलात जवळपास ८० हजार नोकऱ्या देण्यात आल्या. तर अप्रत्यक्ष कर विभागात ५३ हजार नोकऱ्या देण्यात आल्या. प्रत्यक्ष कर विभागात २९,९३५ लोकांना रोजगार मिळाला. १ मार्च २०१७ मध्ये अप्रत्यक्ष कर विभागात ५३, ३९४ कर्मचारी, तर प्रत्यक्ष कर विभागात ५०,२०८ कर्मचारी होते.

संरक्षण विभागात ४६,३४७ लोकांना रोजगार मिळाला. मार्च २०१७ साली या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४२, ३७० होती. जी मार्च २०१९ ला वाढून ८८,७१७ झाली.

या विभागात मिळाल्या एवढ्या नोकऱ्या –
मागील २ वर्षात परमाणूू ऊर्ज विभागात जवळपास १०,०००, दूरसंचार विभागात २२५०, जल संसाधन, नदी विकास विभागात ३९८१ लोकांना रोजगार देण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात ७७४३ लोकांना रोजगार मिळाला. तर अंतराळ विभागात २९२० लोकांना रोजगार मिळाला. परराष्ट्र मंत्रालयात १८३३ रोजगार मिळाले.

या दोन वर्षात संस्कृतिक मंत्रालयात ३६४७, कृषि विभागात १८३५ आणि नागरी विमान मंत्रालयात ११८९ लोकांना नोकऱ्या मिळाल्या.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर