गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक, ३ लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – गांजा बाळगणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख २७ हजार २७० रुपयांचा १६ किलो ५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली.

प्रल्हाद सुनिल माचरे (वय-२१ रा. संजय गांधी नगर झोपडपट्टी, जळगाव), संतोष बन्सी गुमाने (वय-३८ रा. भाटनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ हे चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष दिघे यांना दोन व्यक्तींकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने हॉटेल ईगल एक्झीक्युटीव्ह जवळ सापळा रचून दोघांना त्याबत घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची झडती घतेली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या दोघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार राजन महाडीक, प्रदिप शेलार, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, पोलीस नाईक संतोष दिघे, दिनकर भुजबळ, पोलीस शिपाई शैलेश मगर, दादा धस, संतोष भालेराव, प्रसाद जंगीलवाड, प्रदिप गुट्टे यांच्या पथकाने केली.

तलाठी, लिपिक ३ हजाराची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us