COVID-symptoms : 3 संकेत ज्यावरून समजते की, तुमचा ‘कोरोना’ आजार गंभीर होतोय, तात्काळ घ्या डॉक्टरांची भेट

नवी दिल्ली : बहुतांश कोरोना व्हायरस संसर्ग (जवळपास 80%) प्रकृतीमध्ये हलका असतो. हलकी प्रकरणे घरात देखभाल करून बरी होऊ शकतात. मात्र, काही प्रकरणात व्हायरसची लक्षणे गंभीर होऊ शकतात.

काही लोकांना गंभीर कोरोना का होतो?
बहुतांश लोकांसाठी कोरोनाचा आजार एकाच प्रकारे सुरू होतो. मात्र काही लोकांची लक्षणे गंभीर होऊ शकतात आणि याची अनेक कारणे असू शकतात. मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की, वेळीच वैद्यकीय मदतीने जीव वाचवता येऊ शकतो.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ती लक्षणे शिकणे आणि ओळखणे आवश्यक आहे, जी तुमच्या हलक्या कोरोनाला गंभीरमध्ये बदलतात. ऑक्सीजनची कमतरता, धाप लागणे, अवयवांचे नुकसान हे सर्व गंभीर इशार्‍याचे संकेत असू शकतात ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका वक्तव्यात सेंट स्टीफन्स हॉस्पिटलचे डॉ. मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितले की, गंभीर कोरोनाचे गांभीर्य आणि इशार्‍याच्या संकेतांना सुरूवातीच्या आठवड्यात ओळखता येऊ शकते आणि यासाठी, वेळीच लक्ष देण्याची खुप आवश्यकता आहे.

ऑक्सीजनच्या पातळीत घसरण, छातीत वेदना किंवा धाप लागणे याशिवाय आणखीही काही संभाव्य इशार्‍यांचे संकेत आहेत, ज्यांना सुरूवातीच्या दिवसात ओळखले पाहिजे, ज्यावरून तुमच्या आजाराच्या गांभीर्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

मोठ्या कालावधीपर्यंत ताप
ताप हा संसर्गाचा सर्वात क्लासिक संकेत झाला आहे. मात्र, आता अनेक प्रकरणांत केवळ ताप असू शकत नाही. मात्र, ताप 4-5 दिवसानंतरही कमी होत नसेल तर चिंतेचा विषय आहे.

संसर्गाचे पहिल्या सात दिवसांदरम्यान कोरोना रूग्णाला खुप सावध राहण्याची आवश्यकता आहे. जर ताप बरा झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसानंतर पुन्हा येत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असू शकते.

जर ताप 6 दिवसांपेक्षा जास्त काळापर्यंत राहिला तर हा निरोगी ऊतींवर व्हायरसच्या हल्ल्याचा संकेत असू शकतो. याच कारणामुळे 5-7 दिवसांना कोरोना रूग्णांसाठी महत्वाचे मार्कर मानले जाते, कारण हा तो काळ आहे जेव्हा साइटोकिन्स पसरतो.

सतत खोकला
कोरोनासोबत सतत खोकला होऊ शकतो. अशाप्रकारचा खोकला इशारा असू शकतो की तुमची फुफ्फुसे आणि श्वास अवयव गंभीर प्रकारे संक्रमित आहेत. सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, जळजळ सुद्धा निमोनियाचे लक्षण असू शकते.

छातीत बेचैनी किंवा जखडणे
लक्षणांच्या सुरूवातीपासून छातीत कशाही प्रकारची वेदना, बेचैनी किंवा जखडणे याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना व्हायरस प्रामुख्याने वरील श्वसन मार्गावर हल्ला करतो, कोणत्याही प्रकारची बेचैनी जाणवणे, जळजळ, श्वास सोडताना घरघर किंवा छातीच्या जवळपास जास्त वेदना होणे याचा संकेत आहे की, व्हायरस खालील श्वसन मार्गात सुद्धा पसरत आहे आणि गंभीर प्रकारे बदलत आहे.