धक्‍कादायक ! लग्‍नाच्या 3 महिन्यानंतर पत्नीचा ‘सोनेग्राफी’ रिपाेर्ट पाहून पती ‘चक्रावला’, उडाली ‘भंबेरी’ अन् झाला ‘मनस्ताप’ (फोटो)

अमृतसर : वृत्तसंस्था – लग्नानंतर ३ महिन्यांनी पत्नीचा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि पतीने लग्नानंतर पाहिलेल्या स्वप्नावर पाणी फिरले. पत्नीच्या त्या रिपोर्टमध्ये ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकरली. हा प्रकार अमृतसर येथील संदीप या तरुणाच्या बाबतीत घडला आहे.
Sandeep1
मिळालेल्या माहितीनुसार, गुज्जरपुरा परिसरातील हा प्रकार आहे. संदिपने आरोप केला आहे की त्याची पत्नी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्याच्यासोबत वाद घालत होती. दोघांमध्ये कधी पटलेच नाही. काही दिवसांनी पत्नी आजारी पडल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर त्यांनी जे काही सांगितले त्यावर आमचा कुणाचा विश्वासच बसला नाही. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. मात्र, लग्नाला तीनच महिने झाले होते.
Sandeep-2
या प्रकरणावरून दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून त्यांना एकत्र बसून यावर तोडगा काढण्यास सांगितले. या प्रकरणावर मुलीचे नातेवाईक काहीच बोलण्यास तयार नाहीत. मात्र, संदिपने पाहिलेले लग्नाचे स्वप्न काही क्षणात भंगले. डॉक्टरानी दिलेल्या अल्टासाऊंड रिपोर्टने संदिपच्या आयुष्याला जणू ग्रहणच लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like